#Social

ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही – देवेंद्र फडणवीस…..! 

मुंबई दि.२४ – ओबीसीच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खूपच गढूळ झालं आहे. याच मुद्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारला फटकारलं आहे.

जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठसुट  केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज भाजप पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण परत मिळवण्याच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं समजतं आहे. ज्यावेळी हायकोर्टात आरक्षणाचा विषय मांडायला हवा होता. त्यावेळी हायकोर्टात तारखा घेत होते आणि मंत्री रस्त्यावर मोर्चा काढत होते. एवढंच नाहीतर आजही पाहा इम्पेरिकल डेटा तयार करत नाहीयेत, तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम, मोर्चे सुरू असल्याचं फडणविसांनी सांगितलं.

दरम्यान भाजप 26 तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा, आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close