#Vaccination

केज उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण आज बंद – डॉ.संजय राऊत

केज दि.२५ – पहिल्या डोस साठी केज उपजिल्हा रुग्णालयात आलेला लसीचा साठा संपल्यामुळे आज दि.२५ रोजी लसीकरण बंद राहणार आहे.मात्र कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यासाठी लस उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली आहे.
           मागच्या चार दिवसांपूर्वी आलेला लसीचा साठा संपलेला आहे. आज दुसरा लॉट येण्याची अपेक्षा होती. मात्र लस उपलब्ध झाली नसल्याने नागरिकांनी पहिला लसीकरणासाठी रुग्णालयात येऊन गर्दी करू नये. मात्र ज्यांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे ते नागरिक येऊ शकतात असे डॉ.राऊत यांनी कळविले आहे. तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर सूचित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close