#Missing
”तो” मुलगा सुखरूप घरी पोहोंचला……!

केज दि.२५ – तालुक्यातील केवड येथील रहिवासी असलेला एक पंधरा वर्षीय मुलगा दि.25 रोजी पहाटे 4.30 वाजता लघुशंकेला बाहेर पडला तो पुन्हा घरात परत आला नसल्याची घटना घडली होती. त्याचा शोध सुरू असताना सदरील मुलगा केज कळंब रोडवरील साळेगाव नजीकच्या पुलावर बसलेला आढळून आल्याने त्याला घरी आणण्यात आले आहे.
रोहीत(टिल्या) विजयकुमार सपाटे वय १५ असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पहाटे लघुशंकेला म्हणून घराच्या बाहेर आला होता. मात्र पुन्हा तो परत घरात आलाच नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला होता. दरम्यान सदरील मुलगा केज कळंब रोडवरील साळेगाव नजीकच्या पुलावर संशयास्पद अवस्थेत बसलेला एका दुधवाल्याला आढळून आला. नंतर त्याची चौकशी केली असता तो केवडचा असल्याचे मुलाने सांगीतल्यावरून त्याचा पालकाला फोन लावून माहिती दिल्यानंतर पालकांनी त्याला घरी आणले असल्याची माहिती त्याचे चुलते चनू सपाटे यांनी दिली. मात्र सदरील मुलगा एवढया पहाटे कसा गेला? की कुणी नेला ? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.