क्राइम
मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेस मारहाण करून माहेरी सोडले,तर अन्य एका घटनेत कुऱ्हाडीने शेतकऱ्याचे डोके फोडले……!
डी डी बनसोडे
June 25, 2021
केज दि.२५ – मूल होत नसल्याचे कारणावरून एका २१ वर्षीय विवाहितेस महिलेस मारहाण करून माहेरी आणून सोडल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बोरगाव ( ता. अंबाजोगाई ) हे माहेर असलेल्या प्रतिक्षा अभिजित काकडे ( वय २१ ) हिचा ७ जुलै २०१९ रोजी सुगाव ( ता. जि. उस्मानाबाद ) येथील अभिजित बन्सी काकडे यांच्या बरोबर विवाह झाला होता. धायरी वडगाव ( जि. पुणे ) कामानिमित्त हे दोघे पतिपत्नी राहत होते. लग्नानंतर पाच महिन्याने सासु काशीबाई काकडे, सासरे बन्सी काकडे, जाऊ कल्पना काकडे, पती अभिजीत काकडे, आजोबा दतु सरवदे, शिला बनसोडे, दिर क्षितीज काकडे यांनी काही ही कारण नसताना टोचून बोलत तुला स्वयपाक निट करता येत नाही. तुला मुलबाळ होत नाही असे म्हणत दुसऱ्या लग्नाला परवानगी दे असे सतत बोलून तुझ्या पतीचे बाहेरच्या मुलीशी अनैतीक संबंध आहे. तु इथे राहू नकोस असे म्हणत व तूला मूल होण्यासाठी दवाखान्यात दाखविण्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी पैसे आण नसता तु इथे राहु नको असे म्हणत बेदम मारहाण करून प्रतिक्षा काकडे हिस माहेरी आणून सोडले. त्यानंतर तिला नांदविण्यास नकार दिल्याची फिर्याद प्रतीक्षा काकडे या विवाहित महिलेने दिल्यावरून वरील पती, सासू, सासरे यांच्यासह आठ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार भागवत कांदे हे पुढील तपास करत आहेत.
आपेगाव येथे शेतकऱ्याचे कुऱ्हाडीने डोके फोडले
केज दि.२५ – तू या रस्त्याने का जातोस असे म्हणत एका ३१ वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून डोके फोडत काठीने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना आपेगाव ( ता. अंबाजोगाई ) येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आपेगाव येथील अजय अनंत तट ( वय ३१ ) व पुरुषोत्तम लोमटे हे दोघे १७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. यावेळी सुशिल राजाभाऊ तट, राजाभाऊ वामन तट, स्वप्निल राजाभाऊ तट यांनी तु या रस्त्याने का जातोस, आठ दिवसा आगोदर आमच्या हाताने वाचलास, आता तुला जिवेच मारतो असे म्हणुन अजय तट यांना शिवीगाळ करुन सुशील तट याने कुऱ्हाड डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर राजाभाऊ तट याने हातातील दगडाने डावे हाताचे करगंळीवर मारुन दुखापत करीत काठीने व दगडाने पाठीत मारहाण करुन मुक्कामार दिला. तर स्वप्नील तट याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. २५ जून रोजी अशी फिर्याद अजय तट यांनी दिल्यावरून सुशिल तट, राजाभाऊ तट, स्वप्निल तट यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक पांडुरंग वाले हे पुढील तपास करत आहेत.