#Social
राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी – कल्याणी वाघमोडे……!
बारामती दि.२५ – वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी उठाव पाहायला मिळत आहे. सर्व ओबीसी संघटनाकडून दाद मागण्यासाठी निवेदन देण्यात येत आहेत.आज बारामती प्रशासकीय भवन येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना हे निवेदन क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी सुपूर्द केले.यावेळी विजया काळे,सुनीता पिंगळे, अजित झारगड उपस्थित होते .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील हे निवेदन देण्यात आले असून उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांनाही मेल द्वारे हे निवेदन पाठविण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाचे फक्त राजकारण न करता सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले. निवेदनावर नगरसेविका नीलिमा मलगुंडे, मंदाकिनी घुले, ऍड.भगवान खारतोडे, पप्पू सोलनकर, डॉ.नवनाथ मलगुंडे, मधुकर सोलनकर, विशाल कोकरे, मयुरेश पांढरे, किसन मासाळ, सुरज माने, विजय काशीद, अमित लव्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.