#Social
ओबीसी आरक्षणासाठीच्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा – धनंजय घोळवे
केज दि.25 – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण नाकारून ओबीसींना राजकीय हक्का पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी भाजपा रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजपच्या दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय घोळवे यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द केले आहे. हा ओबीसी समाजावर झालेला अन्याय आहे. या संदर्भात राज्य शासनाने पूर्ववत राजकीय आरक्षण सुरू ठेवावे. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही; तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका न घेण्याची मागणी भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे व खा. प्रीतमताई मुंडे यांनी केली आहे. ओबीसीच्या हक्कासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्षा मा.पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशाने जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात येणार आहे.आपल्या राजकीय हक्कासाठी सर्व कार्यकर्ते आणि ओबीसी बांधवांनी दि.२६ जून रोजी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजप दिव्यांग आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष धनंजय घोळवे यांनी केले आहे.