#Social
केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको……!
केज दि.२६ – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा रोष म्हणून आज राज्यभर भाजपच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.त्याच अनुषंगाने केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, तालुकाध्यक्ष भगवान केदार, उपसभापती ऋषिकेश आडसकर, युवानेते विष्णू घुले, दत्ता धस, जि. प.सदस्य डॉ.योगिनी थोरात, रमाकांत मुंडे, जि. प.सदस्य विजयकांत मुंडे, प्रकाश राऊत, अनिता केदार,सुनील घोळवे, महादेव सूर्यवंशी, प्रवीण देशपांडे, सुरेंद्र तपसे,मुरलीधर ढाकणे, अनंत राऊत, संभाजी गायकवाड, रामकृष्ण घुले, लिंबराज फरके, शेषेराव कसबे यांच्यासह शेकडो ओबीसी समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान आंदोलन स्थळी येऊन तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी निवेदन स्वीकारले तर आ. नमिता मुंदडा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.