केज दि.२९ – दुचाकीने कुत्र्यास धक्का का दिला अशी विचारणा केल्यावरून ३० वर्षीय महिलेस शिवीगाळ व विनयभंग करीत गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचे गंठण तोडून घेतले. तर पीडित महिलेच्या दिराचे लोखंडी गजाने मारून डोके फोडल्याची घटना केज ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय महिलेने त्यांच्या कुत्र्यास संतोष भिमराव आहिरे याने दुचाकीचा धक्का का दिला ? अशी विचारणा केली असता २८ जून रोजी दुपारी ३ वाजता संतोष याने तुला काय करायचे असे म्हणत शिवीगाळ करीत विनयभंग केला. गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे गंठण तोडून घेतले. रिपाली हजारे हिने पीडित महिलेच्या डोक्यात लोखंडी गज मारून डोके फोडले. तर अर्चना दादा वाघमारे व भिमराव आहिरे या दोघांनी पीडितेस शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद २९ जून रोजी पीडित महिलेने दिल्यावरून संतोष आहिरे, रिपाली हजारे, अर्चना वाघमारे, भिमराव आहिरे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे पुढील तपास करत आहेत.