डेल्टा प्लस व्हेरिएंट बाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून महत्वाचा खुलासा…….!
नवी दिल्ली दि.२ – डेल्टा प्लस व्हेरिअंट हा सध्या चिंतेचा विषय नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. त्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.जागतिक आरोग्य संघटना वॅक्सिन पासपोर्टमध्ये कोविशिल्डचा समावेश करण्यासाठी युरोपियन वैद्यकीय नियामकाशी चर्चा करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, असं स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.
डेल्टा प्लस व्हेरिअंट या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या खुप कमी आहे. कोविशिल्ड या लसीला आपल्या वॅक्सिन पासपोर्ट कार्यक्रमापासून रोखणाऱ्या देशांकडे कोणताही तर्क नव्हता, जे महासाथीदरम्यान कोणत्याही समस्येशिवाय प्रवासाची परवानगी देतं, असं सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक आधार नाही ज्याने हा व्हायरस वेगाने संसर्ग पसरवत आहे हे सिद्ध होईल किंवा कोविड लसीचा प्रभाव कमी करत आहे. महामारीची नवी लाट अनेक गोष्टींवर निर्भर असते.
दरम्यान विषाणूमध्ये होणारे बदल कोरोना आजाराची गतिशीलता बदलू शकते. महासाथीची आणखी एक लाट येईल की नाही, हे आमच्या नियंत्रणाखाली नाही, असं मत भारतातील कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के पॉल यांनी व्यक्त केलं आहे.