क्राइम
दगड मारून मेहुण्याने मेव्हूण्याचे फोडले डोके……!
केज दि.२ – तुझ्या पत्नीने उचल देऊ नका असे का सांगितले, अशी कुरापत काढत दगड मारून मेहुण्याचे डोके फोडले. ही घटना मस्साजोग येथे घडली.
विडा येथील अपे रिक्षाचालक विनोद चंद्रकांत ऊर्फ कांता वाघमारे (३६) हे ३० जून रोजी दुपारी ४ वाजता मस्साजोगहून गावाकडे निघाले होते. तेवढ्यात मस्साजोग बसस्थानकावर त्यांचे मेहुणे अनिल सतीश सोनवणे (रा. मस्साजोग, ता. केज) यांची भेट झाली. अनिल सोनवणे याने विनोद वाघमारे यांना तुझ्या पत्नीने स्वाती भीमराव ओव्हाळ (रा. अस्वला, ता. धारूर) या महिलेस मला उचलीचे पैसे देऊ नका असे का सांगितले, अशी कुरापत काढून शिवीगाळ करत विनोद वाघमारे यांचे दगड मारून डोके फोडले असून ते जखमी झाले. याप्रकरणी अनिल सोनवणे विरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार दिनकर पुरी करत आहेत.