#Missing
केज तालुक्यातून २५ वर्षीय युवती बेपत्ता……!
केज दि.२ – तालुक्यातील तरनळी येथील सोनाली बब्रुवान सरवदे वय २५ वर्षीय ही युवती ही दि.३० जून बुधवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंबाजोगाई ते औरंगाबाद बसने बीड येथील बहीणीकडे जाते म्हणून गेली. परंतु ती बहीणीकडे पोहचली नाही. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी सोनाली बब्रुवान सरवदे हिचा सर्वत्र शोध घेतला पण ती काही आढळून आली नाही. बेपत्ता युवतीच्या वडीलाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास जमादार रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.