पंधरा वर्षे एकत्र राहून ‘यांनी’ घेतला घटस्फोट……!
मुंबई दि.३ – प्रसिद्ध बॉलीवडू अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी संयुक्तरित्या एक पत्रक जारी केलं आहे. लग्नाला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर घटस्फोट घेत असल्याचं त्यांनी म्हटल आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी” आम्ही जीवनातील नवीन अध्याय सुरु करत आहोत. आता आम्ही पती पत्नी न राहता संयुक्त पालक आणि कुटुंब म्हणून एकत्र राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे” एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबात ट्विट केलं आहे.
या सुंदर 15 वर्षांमध्ये आम्हाला एकत्रित आयुष्यभराचे अनुभव, आनंदाने जगता आलं. आमचं नातं केवळ विश्वास, आदर आणि प्रेम यावरच फुलले. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करायचा आहे. आम्ही आता फार काळासाठी पती-पत्नी असं न राहता, माता-पिता आणि कुटुंबाच्या रुपात राहू. आम्ही काही काळापूर्वीच नियोजनपूर्वक वेगळं होण्याची सुरुवात केली होती. आता त्याला औपचारिक रुप दिल्यानं बरं वाटत आहे. विस्तारित कुटुंबाप्रमाणं आमचं जीवन वेगळं जगणार असलो, तरी महत्वाच्या प्रसंगात एकत्र असू.आम्ही मुलगा आझादची जबाबदारी आई-वडील म्हणून पार पाडू, त्याचं पालन पोषण दोघेही सहकारी म्हणून करु. आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांमध्ये सहकारी म्हणून काम सुरु ठेवणार असून त्याबद्दल आम्ही भावूक आहोत.
दरम्यान आमच्या नात्यातील या निर्णयाला सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य करणारे आमचे कुटुंबीय आणि मित्र यांनादेखील धन्यवाद देतो. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही सुरक्षितपणे या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो.आम्हाला आमच्या शुभचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळण्याची आशा आहे. आमच्यासारखं तुम्हीही या घटस्फोटाकडे शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे, अशा दृष्टीने पाहाल!