#Social

अखेर….. नवरदेवाला बिना नवरीचं घरी परतावं लागलं……!

अहमदनगर दि.4 – अहमदनगर येथील एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अनेक वेळा काही विचित्र कारणांमुळे मंडपातच लग्न तुटल्याच्या घटना आपण ऐकतो. असंच काहीसं संबंधित घटनेमध्ये देखील घडलं आहे.

कोरोना काळात चालू असलेल्या निर्बंधांमुळे अहमदनगर येथील एका तरुणाचा साखरपुडा आणि लग्न तसेच इतर विधी देखील एकाच दिवशी ठेवण्यात आले होते. यावेळी साखरपुडा झाल्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. साखरपुडा झाल्यानंतर हळदीची तयारी सुरु असताना नवरीने नवऱ्याचे मित्र बरोबर नसल्याचं कारण सांगून लग्नाला नकार दिला.नवरीचा निर्णय ऐकून मांडवातले सर्व नातेवाईक, पाहूणे चकीत झाले. अनेकांनी नवरीला समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र नवरी तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर नवरदेवाला बिना नवरीचं घरी परतावं लागलं. संबंधित संपुर्ण घटना ही शुक्रवारी घडली असून ही घटना अहमदनगर येथील काष्टी येथील आहे. तसेच संबंधित नवरदेव हा श्रीगोंदा येथील रहिवासी आहे.

दरम्यान, वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं काष्टी याठिकाणी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र वराचे मित्र चांगले नाहीत असं कारण देत वधूनं चक्क लग्न मोडलं आणि सुखा दुःखात साथ देणारे मित्र तरुणासाठी विघ्न ठरले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close