क्राइम
पैश्याच्या देण्याघेण्यावरून एकाला पळवले, पत्नीची केज पोलीसात तक्रार.….…!

केज दि. ४ – पैश्याच्या देण्याघेण्यावरून पतीला पळवून नेल्याची तक्रार केल्यावरून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील बनकरंजा येथील सहदेव कोंडीबा नागरगोजे ह्यांना दि.३ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता केज बसस्टँड परिसरातून पैश्याच्या देण्याघेण्यावरून सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीतून बाळू चौरे रा.जिवाचीवाडी यांनी पळवून नेल्याची तक्रार सहदेव नागरगोजे यांची पत्नी कांचन सहदेव नागरगोजे यांनी दिली आहे.
सदर फिर्यादीवरून बाळू चौरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे करत आहेत.