बोरगाव येथे रुक्मिणबाई बापू शिंदे ही महिला बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती मिळल्यावरून केज पोलिसांनी दि.३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी 17 लिटर गावठी दारू व साहित्य असा एकूण ६८०० रुपयांचा माल मिळून आला.
दरम्यान बिट अंमलदार अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रुक्मिणबाई बापू शिंदे या महिलेवर केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री.गवळी हे करत आहेत.