#Job

३१ जुलै पर्यंत सरकार एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरणार……!

मुंबई दि.५ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा आणि नियुक्त्या तातडीने भराव्या अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आल्या नंतर राज्य सरकारने याबाबत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

३१ जुलै पर्यंत सरकार एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. त्याचबरोबर मला या राज्यातील तमाम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे कि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि सगळी भरती तातडीने करण्यासाठी आग्रही असताना सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिल्याने न्यायव्यवस्थेचा आदेश सर्वाना मान्य करावा लागतो आणि तशा प्रकारची मार्ग काढण्याची भूमिका राज्य सरकारची आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं

दरम्यान स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबद सरकार सकारात्मक भूमिका घेईल तसेच सरकार कोणाचेही असलं तरी अशी घटना घडत काम नये असेही अजित पवार यांनी म्हंटल . आम्हीदेखील लोणकर कुटुंबियांच्या दुखत सहभागी असून पुन्हा राज्यातील कोणत्याही मुलावर येणार नाही अशा प्रकारची खबरदारी सरकार नक्कीच घेईन अशी खात्री अजित पवार यांनी दिली

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close