शेती

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ, व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन……! 

बीड दि.६ – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड दि. ३० जूनपर्यंत करतात. अशा शेतक-यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते.
                     राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता दि. १ जुलै, २०२१ रोजीचे शासन निर्णयाद्वारे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२० २१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दि. ३१ जुलै, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
                         दरम्यान सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या गत वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड दि.३१ जुलै, २०२१ पर्यंत संबंधित बँक शाखेमध्ये करून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेणेबाबत मा. जिल्हाधिकारी, बीड श्री. रविंद्र जगताप यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close