
नांदेड दि.9 – जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली य राज्य सहसचिव देवेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली व जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) जिल्हा शाखा नांदेडची नूतन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. त्यास राज्य कार्यकारीणीने मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये जिल्हा अध्यक्षपदी प्रल्हाद थोरवटे तर सचिवपदी सिध्दार्थ हत्तीअंबिरे व कार्याध्यक्षपदी राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्षपदी प्रेमानंद तलवारे यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारिणीत सहकार्याध्यक्ष धनंजय गुमलवार, सहकोषाध्यक्ष बालाजी महाजन उपाध्यक्ष शेख मुक्रम, रवि रेड्डी, शिवराज माटाळकर, संतोष पांडे, अविनाश मेडपलवाल, अलकेश शिरसेटवार, बालाजी आवर्दे, विक्रम रेणगुंठवार, राजेंद्र बासनुरे, छाया कांबळे, गणेश अंबेकर, गोविंद पोलसवार, गजानन काळे सहसचिव मुकेश पाटील, प्रल्हाद अडबलवार, सतिश चोरमले, विजय टोकलवार, शेख नवाज, श्रीराम पाठक, प्रदिप पोरडवार, सुदर्शन मस्के, महेश लोणीकर, संतोष मठपती, संजय वाघमारे, शेख रब्बानी, संजय शितळे, वैभव सुरोशे, नितीन पांपटवार, अंकुश राठोड, संघटक बाबुराव गोटमवाड, दुष्यंत हटकर, सचिन चौदंते, बालाजी सुरकुटवार, संतोष राऊत, उदय देशपांडे, साईनाथ अंकमवार, शिवाजी वैद्य प्रमुख सल्लागार व्हि. जी. ईनामदार, एम. एम. बजे, माधवसिंह चौहाण, देवेंद्र देशपांडे, शिवाजी मुपडे, बालाजी ताटीपामडे, आर. टी . सातव, नागेश सिंदगीकर, संजय नरमीटवार, ख्वाजा मोहीयोद्दीन, महिला प्रतिनिधी श्रीमती कलावतीबाई नाईनवाड, वंदना देशमुख, श्रीमती इंदुताई वाघमारे, रेखा बोबडे, प्रसिध्दी प्रमुख गणेश अंबेकर आदींची उपस्थिती होती.

दरम्यान कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर राहून त्यांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्ष प्रल्हाद थोरवटे यांनी व्यक्त केले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.