केज तालुक्यातील विडा येथील लक्ष्मी मनोहर दुनघव ही वृद्ध महिला आपल्या पतीसह केज शहरातील नणंदला भेटण्यासाठी आले होते. भेटून परत गावाकडे जाण्यासाठी शहरातील बसस्थानकात थांबले होते. विड्याकडे जाणारी बस लागल्यानंतर हे दाम्पत्य बसकडे गेले. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा लक्ष्मी दुनघव यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचे १० ग्रामचे मणी मंगळसूत्र काढून घेतल्याची घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. २२ ऑगस्ट रोजी लक्ष्मी दुनघव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब अंहकारे हे करीत आहेत.