राजकीय
बीड जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे……!

बीड दि.१० – खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरू झाल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.त्यात खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांची वर्णी लागेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु खा.मुंडे यांची वर्णी न लागल्याने मुंडे समर्थकांत मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा देऊन नाराजी उघड केली होती. त्यानंतर आज जिल्ह्यातील सुमारे चौदा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
