राजकीय
केज पंचायत समिती सभापती परिमळा विष्णू घुले यांच्यासह अन्य तीन सदस्यांनीही दिला राजीनामा……!

केज दि.११ – मुंडे कुटुंबियांचे कट्टर समर्थक तथा बीजेपी चे युवा नेते विष्णू घुले यांच्या पत्नी केज पंचायत समितीच्या सभापती परिमळा घुले यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अन्य तीन पंचायत समिती सदस्यांनीही राजीनामा दिला आहे.
तालुक्यातील टाकळी गणातून निवडून आलेल्या परिमळा विष्णू घुले यांची केज पंचायत समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्णी लावली होती. विष्णू घुले हे मागच्या अनेक वर्षांपासून मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय समजले जातात. पंकजा मुंडे म्हणतील ती पूर्वदिशा एवढी निष्ठा विष्णू घुले यांची आहे. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने व पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना झाल्याने सभापती परिमळा घुले यांनी बिजेपीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.तर त्यांच्यासह पंचायत समिती सदस्य अनिता भगवान केदार, तानाजी जोगदंड, सुलाबाई सरवदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर कालच तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनीही राजीनामा दिल्याने केज तालुका भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षाबद्दल उघड नाराजी व्यक्त होत आहे.
