ब्रेकिंग

अशोक सौदागर चे दुर्दैवी निधन….!

9 / 100 SEO Score
केज दि.१२ – अतिशय कठोर मेहनत करून आणि तेवढ्याच नम्रतेने गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या अशोक सौदागरच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे.
         केज शहरातील गॅस एजन्सी मध्ये काम करणारा अशोक सौदागर हा कोल्हापूरकडे देवदर्शनासाठी इतर काही जणांबरोबर गेला होता. मात्र कोल्हापूर नजीक असलेल्या एका नदीमध्ये रविवारी सकाळी सहा वाजता आंघोळ करत असताना पाण्यात बुडून अशोक चा दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र अशोक संपूर्ण केज शहरांमध्ये अतिशय तत्पर सेवा देणारा ”गॅस बॉय” म्हणून सर्वांना परिचित होता. नम्रतेने बोलणे आणि तेवढेच तत्परतेने सेवा देणे या त्याच्या गुणांमुळे तो सर्वपरिचित झालेला होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून त्याच्या प्रती असलेल्या संवेदना व्यक्त होताना दिसत आहेत. अशोकच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि दोन अपत्य आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close