#Job

बँकिंग लिपिक पदांसाठी अधिसूचना जारी……!

मुंबई दि.१२ – इनस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPS ने लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. ही भरती प्रक्रिया अनेक सरकारी बँकांमधील 5 हजारापेक्षा अधिक पदासांसाठी होणार आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छिणारे उमेदवार आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट IBPS.IN वर अर्ज करु शकतात. यावर्षी एकूण 5 हजार 858 पदासांठी भरती होणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस आणि सीआरपीद्वारे केली जाणार आहे. रविवारी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर्षी या पदासाठी प्रिलिम परीक्षादेखील घेण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रिलिम्स परीक्षेचे प्रशिक्षणही घेतलं जाणार आहे.

            अर्ज करण्याची तारीख  12 जुलै, 2021 शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2021आहे. 16 ऑगस्ट 2021 रोजी प्रिलीम प्रशिक्षण तर प्रिलिम परीक्षा 28, 29 ऑगस्ट, 4 सप्टेंबर 2021दरम्यान होईल. मुख्य परीक्षा  31 ऑक्टोबर 2021 रोजी निर्धारित आहे. इच्छुक उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज करताना आजपासून 1 ऑगस्टपर्यंत 850 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन बोर्ड म्हणजेच आयबीपीएसनं प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB)मधील विविध जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ऑफिसर स्केल- I(PO) प्रोबेशनरी ऑफिसर, ऑफिस असिस्टंट- मल्टिपर्पज क्लार्क आणि ऑफिसर स्केल II आणि ऑफिसर स्केल IIIच्या पदासांठी अर्ज सादर करायचे आहेत. नोटिफिकेशननुसार 10368 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. यापदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून आहे.

संपूर्ण देशभरातील प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये 10368 जागांवर भरती होणार आहे. यापदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार आयबीपीएसच्या वेबसाईटवर ipbs.in भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीबाबचं नोटिफिकेशन 7 जूनला जारी करण्यात आलं आहे. आयबीपीएस 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान पूर्व परिक्षेचे आयोजन करेल.आयबीपीएस पूर्व परीक्षा ऑनलाईन मोड द्वारे घेणार आहे. 1, 7 ,8,14, 21 ऑगस्टला पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बोलावलं जाईल. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी मुख्य परीक्षा 25 सप्टेंबर तर क्लार्क पदासाठी परीक्षा 3 ऑक्टोबरला आयोजित केली जाईल.

ऑफिस असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-I असिस्टंट मॅनेजर पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील शेती, फळबागतंत्रज्ञानस, पशुवैद्यकीय आणि इतर अभ्यासक्रमातील पदवी असणं आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी मात्र 50 टक्केहून अधिक गुण आवश्यक आहेत. स्पेशालिस्ट ऑफिसर माहिती तंत्रज्ञानसाठी संगणक क्षेत्रातील अभ्यासक्रमांची पदवी, पदविका असणं आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close