#Unlock
राज्यातील निर्बंध कायम, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…..!
केज दि.१४ – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंध कांही शिथिल होतील अशी अपेक्षा होती.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्त तरी कुठल्याच प्रकारची शिथिलता देण्यात आली नसून लेव्हल तीन चे सर्व नियम कायम राहतील असे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावलीसह लोकल सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवासाचा विचार व्हावा, अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मात्र, त्याबाबत आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरात व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. त्यामुळे व्यापारी वर्गाचा संताप पाहता व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याबाबतही या बैठकीत निर्णय झालेला नाही.
दरम्यान उद्या पासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत त्यासंबंधी राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी 18 वर्ष वयोगटातील लसीकरण सुरू असल्याने कॉलेजेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास हरकत नसल्याचे व त्यानंतरच शाळा सुरू कराव्यात असे आरोग्य विभागाचे मत असल्याचे श्री.टोपे यांनी स्पष्ट केले.