क्राइम
मुलीचे वाटोळे केले म्हणत शिवीगाळ करून मारहाण…..!
केज दि.१५ – तुम्ही माझ्या मुलीचे लग्न चांगल्या ठिकाणी जमवले नाही अशी भांडणाची कुरापत काढून फिर्यादीस, पत्नी व मुलास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पिसेगाव येथे घडली आहे.
तालुक्यातील पिसेगाव येथील राम मिटु काळे, तुळशीराम मिटु काळे, मंगल राम काळे व शारदा तुळशीराम काळे हे सर्व दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजता फिर्यादी बाबासाहेब मिटू काळे यांच्या घरी आले. यावेळी राम मिटू काळे याने तुम्ही माझ्या मुलीचे लग्न चांगल्या ठिकाणी जमवले नाही तुम्ही तिचे वाटोळे केले असे म्हणून भांडणास सुरुवात केली व फिर्यादी व त्याच्या पत्नीस शिवीगाळ करून फिर्यादीस विटाने मारून कपाळावर व ओठावर दुखापत केली. तर इतर तिघांनी फिर्यादीच्या पत्नीस व मुलास शिवीगाळ करून चापटा बुक्क्याने मारहाण केली अशी फिर्याद बाबासाहेब मिटू काळे यांनी दिल्यावरून चौघां विरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री. अहंकारे हे करत आहेत.