#Education
दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी…….!
बीड दि.१६ – कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासावर तयारी केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर झाला.त्यामध्ये राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला असून यावर्षीही मुलींनीच बाजी मारली असून अंतर्गत मूल्यमापणावर आधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मागच्या दीड वर्षांपासून कांही दिवसांचा अपवाद वगळता शाळा बंद आहेत.सर्वच विद्यार्थी घरी असल्याने ऑनलाइन अभ्यासावर भर देण्यात आला.शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण विभाग आणि पालकांवर प्रचंड ताण आला होता. तर विद्यार्थ्यांचा निकाल नेमका कसा लावायचा हा पेच निर्माण झाला होता. परंतु बऱ्याच विचारांती नववीच्या गुणांवर व अंतर्गत मूल्यमापणावर आधारित निकाल जाहीर करण्याचे ठरवण्यात आले.त्यानुसार 50:30:20 असा फॉर्म्युला ठरवून निकाल समिती गठीत करून निकालाचे काम करण्यात आले. आज दि.16 रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला आहे.यामध्ये नववीच्या वर्गात ज्या विद्यार्थ्यांना चांगली टक्केवारी होती त्यांना दहावीच्या निकालातही चांगली टक्केवारी मिळाली आहे. जाहीर झालेल्या निकालात दरवर्षी प्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे.
दरम्यान यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरिक्षर्थी निकालाची टक्केवारी 90.85 इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. 6922 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.
.