#Education
कु. स्नेहा वाघमारेचं दहावीच्या परिक्षेत घवघवित यश…..!

गेवराई दि. १६ – नुकताच दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहिर झाला असुन यावर्षिदेखील राज्यात मुलीनी बाजी मारली असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील मादळमोही येथील ग्रामसेवक सुनिल वाघमारे यांची कन्या स्नेहा सुनिल वाघमारे हिने घवघवित यश संपादन केले आहे तिला ९९ . ८० ऐवढे गूण मिळाले आहेत तसेच गढीच्या शिवशारदा पब्लीक स्कुलमध्ये ती प्रथम आली असुन तिचे मित्र परिवार नातेवाईक तसेच शिक्षक वृदांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .