क्राइम

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर गोळी झाडली, बीड जिल्ह्यातील घटना…..!

बीड दि.१७ – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले. हि घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई (जि. बीड) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तुल लावून गोळी झाडली. मात्र गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close