#परभणी
भाजपा शिक्षक आघाडीची जिल्हा बैठक संपन्न,विविध विषयांवर चर्चा……!

परभणी दि.१८ – भाजपा शिक्षक आघाडी परभणी ग्रामीण व महानगराची बैठक विभागीय संयोजक प्राध्यापक नितीन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कृती कार्यक्रमानुसार विविध विषयावर चर्चा झाली.
सदरील बैठकीत विशेष करून गुरुपौर्णिमा, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरण यावर चर्चा झाली. याशिवाय प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांच्याशी लोकप्रतिनिधी सोबत सहविचार सभा आयोजित करण्याचे ठरले.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉक्टर सुभाष कदम जिल्हा संघटन सरचिटणीस बाबासाहेब जामगे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस जिल्हा संयोजक (ग्रामीण) अरविंद वडकर व महानगर संयोजक लखन सिंग जाधव, सहसंयोजक दिनकर ठोंबरे, राजपाल दुर्गे, सरचिटणीस किशनराव काळे, हांगर्गे सर, कराळे सर, तळेकर सर, आदि शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.