#निधन वार्ता
केज तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बी.के.राऊत यांचे निधन……!
केज दि.१९ – तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी तथा दै. सिंदफणा चे संपादक जेष्ठ पत्रकार बी.के.राऊत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये दीर्घकाळ आपल्या सक्रियतेमुळे परिचित असणारे जेष्ठ पत्रकार तथा दै. सिंदफणाचे संपादक बी.के.उर्फ बाबासाहेब राऊत यांचे त्यांच्या राहत्या गावी चिंचोली माळी येथे वार्धक्याने निधन झाले.ते विविध पत्रकार संघटनांत सक्रिय होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संबंधित बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते दीर्घकाळ पदाधिकारी होते.तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सतत संघर्ष केला.त्यांच्या पुढाकारातून बीड येथे पत्रकार भवनाची निर्मिती झाली आहे.लोककला हा त्यांच्या आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय होता. ते लोककलावंत म्हणूनही सुपरिचित होते.आपल्या लेखणीच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली.त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील जुन्या पिढीतील एक धडाडीचा पत्रकार गमावला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,मुली,सुना, जावाई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.