#Social

माजलगाव तालुक्यातील घटना घृणास्पद, खटला जलदगती न्यायालयात चालवावा – रजनीताई पाटील

केज दि.२१ – माजलगाव तालुक्यात एका २८ वर्षीय नराधमाने ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समजली अतिशय घृणास्पद व लाजिरवाणी घटना असून याचा आपण तिव्र शब्दात निषेध करून यामधील दोषींला तात्काळ शिक्षा व्हावी व हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी मी स्वतः राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना करणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या रजनीताई पाटील यांनी बोलताना सांगितले.
            माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद आता उमटू लागले असून काँग्रेसच्या नेत्या व जम्मू काश्मीर च्या प्रभारी रजनीताई पाटील यांनी देखील हा प्रकार अतिशय किळसवाणा असून अशा आरोपींना कठोरपणे शिक्षा व्हायला हवी जेणे करून पुन्हा असे प्रकार करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. अतिशय वेदना देणारी ही घटना असून आपण याबाबत राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांना तात्काळ बोलून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करणार आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close