संपुर्ण शहराला पुराचा वेढा, रस्ते बंद झाल्याने बचावकार्यत अडथळे…..!
(संग्रहीत फोटो)
महाड दि.२२ – मागची सावित्री नदीवरून एसटी बस खाली कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाल्याच्या आठवणी आणखी लोक विसरलेले नाहीत. त्यातच कालच्या पावसाने शहराला पुराचा वेढा पडला असून कित्येक घरे पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी NDRFची टीम दाखल झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. महाडमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून रसद पुरवली जात आहे. महाडमध्ये पुराच्या पाण्यात मगरींचा वावर असल्याने मोठा धोका निर्माण झाला असून महाडकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळती असून या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.