क्राइम
”त्या” तरुणीच्या आत्महत्येचे कारण आले पुढे…….!

नेकनूर दि.२७ – बीडच्या शिवाजी नगर भागातील रहिवाशी असलेल्या सोनाली अंकुश जाधव (वय-२६) या तरुणीने पालीजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२६)सायंकाळी घडली होती. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलीस तपासातून त्या तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली आणि बीडच्या एका खाजगी लॅबमधील अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय-२७ रा. डोईफोडवाडी) याचे प्रेमसंबंध आले होते. सोनालीने अक्षयकडे लग्नासाठी हट्ट धरला होता. मात्र अक्षयने लग्नाला नकार दिल्याने सोनालीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकारणी सोनालीचा भाऊ अजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करीत आहेत.