महाराष्ट्र

स्थानिक स्तरावर यंत्रणा कार्यान्वित करा,राज्य सरकारचे आदेश……!

पुणे दि.28-  महाराष्ट्र सरकारनं मराठा समजातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सगळ्या तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना एसईबीसीच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाची प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्तरावर यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत, असे आदेश राज्य सरकारनं सर्व तहसीलदार आणि विभागीय आयुक्त यांना दिले आहेत. स्थानिक स्तरावर सगळी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना काढण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भात आदेश काढले आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारनं एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएसचा लाभ देण्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांना ईडब्लूएस प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने आदेश खाढले आहेत. एसईबीसीच्या उमेदवारांना आता ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close