आपला जिल्हा

रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची उद्यापासून होणार अँटिजेन टेस्ट…..!

जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

बीड दि. ३० – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
                    आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी असे निर्देश ना. मुंडे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. कोरोना (Covid-19 ) आणि लसीकरणा बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालक मंत्री ना. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते, बैठकीसाठी आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे , प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
           ते  पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधेल, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. बैठकीमध्ये आढाव्या दरम्यान जिल्ह्यात आठवड्यास 10 हजार लस उपलब्ध होत असल्याचे दिसून आले. जिल्ह्याची क्षमता प्रतिदिन 1 लाख लसीकरणाची असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लस उपलब्धतेचे प्रमाण वाढावे. यासाठी मंत्रीमहोदयांनी बैठकीतून थेट राज्याच्या आरोग्य संचालकांना दूरध्वनी करून सूचना दिल्या. यावेळी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी ऑगस्ट महिन्यापासून बीड जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासणार नाही, असे आश्वस्त केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close