क्राइम
संगनमताने वकीलास लाकडी दांड्याने मारहाण……!

गेवराई दि. २ – तालुक्यातील ब-हाणपुर येथे राहणाऱ्या एका वकिलाला पक्षकाराचे काम का केले ? म्हणुन पाडळशिंगी येथील तिघांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन लाकडी दांड्याने मारहान केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी गणेश नारायण दाभाडे, गोविंद भगवान दाभाडे, बालाजी संतोष दाभाडे यांनी संगनमत करून मारहाण केल्याच्या विरोधात गेवराई पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पक्षकाराचे काम का केले म्हणुन मारहान करण्यात आली असल्याची तक्रार ऍड. भागवत सुधाकर यादव यांनी गेवराई पोलिसांत दिली असुन सदरच्या घटनेचा गेवराई वकिल संघाकडून जाहिर निषेध करण्यात आला असून आरोपीने केलेले कृत्य अतिशय निंदनीय असुन सदरील आरोपीचे वकिलपत्र वकिल संघाकडून कोणीही स्विकारनार नाही असा ठराव घेण्यात आल्याची माहिती वकिल संघाचे अध्यक्ष ऍड.अमित मुळे यांनी दिली.