प्रतीक्षा संपली……बारावीच्या निकालाची तारीख अन वेळ ठरली…….!
मुंबई दि.२ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या (3 ऑगस्ट) जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे बारावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावण्यात येणार आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. निकाल पाहण्यासाठी बोर्डाने एकूण चार नव्या वेबसाईट जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना या अधिकृत वेसबाईटवर त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत. या वेसबाईट्स खालीलप्रमाणे आहेत.
1. https://hscresult.11 thadmission.org.in
2. https://msbshse.co.in
3. hscresult.mkcl.org
4. mahresult.nic.in.
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल. निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.