केकतसारणी येथील विलास माणिक उमक ( वय ३४ ) हे मजुरी करून कुटुंबाची गुजरान करीत होते. १९ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विलास उमक यांनी गावातील अभिमान्यू झांजे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. केकतसारणी येथील सरपंच पती दत्तात्रय आश्रूबा शेंडगे यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे पुढील तपास करत आहेत.