अनलॉक नाही, मात्र नवीन नियमावली जाहीर केल्याने मोठा दिलासा……!

मुंबई दि.३ – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून अनलॉकची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संपुर्ण अनलॉक नाही तर नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील 11 जिल्ह्यांमधे निर्बंध कायम ठेवले आहेत.
नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येणार आहेत. तर हे सर्व शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रविवारी दुकान पूर्णपणे बंद असणार आहेत. मुंबईमधील लोकलसेवा अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई आणि ठाण्याचा निर्णय आपत्कालीन विगाग घेणार आहे. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास परवानगी मिळाली आहे. सक्रीय रूग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड आणि पालघर यांचा समावेश आहे.