सारणी येथील प्रगतशील शेतकरी लिबराज अंबादास सोनवणे यांनी शेतात शेततळे केले आहे व या शेततळ्याच्या बाजूलाच सोलार बसवून विजेचा प्रश्न सोडवला होता. मात्र अज्ञात इसमाने केवळ नुकसानीच्या हेतून सोलार प्लेट फोडली असून जवळपास २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने युसूफवडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.