आरोग्य विभागात विविध पदांसाठी मोठी भरती……!

मुंबई दि.6 – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या 2725 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
यामध्ये एकूण 2725 जागांसाठी भरती होणार असून गट- क वर्गाच्या जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. सदरील जागा ह्या पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ या ठिकाणी आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यास 6 ऑगस्ट 2021 पासून सुरुवात होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. www.arogya.maharashtra.gov.in