जमीन आता परवानगीशिवाय विकता आणि खरेदी करता येणार नाही……!
मुंबई दि. 8 – राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात शेतजमीन खरेदी-विक्री नियमात मोठे बदल करण्यात आले आहे. यानुसार आता जमीन-खरेदी विक्रीआधी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याचे नोंदणी महानिरिक्षक श्रावण हार्डीकर यांनी नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता जमीन-खरेदी विक्री करताना काही नियम घालण्यात आले आहेत.
जिरायत जमीन 2 एकरापेक्षा कमी असल्यास खरेदी-विक्री आधी परवानगीची गरज असेल.तर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे. तसेच 2 एकराचा गट असेल आणि त्यातील विकायची असेल तर 5 ते 6 गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही.
दरम्यान, जमिनीचे तुकडीकरण, वादविवाद आणि गुंतागुंत कमी व्हावी यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आता व्यवहार पूर्ण होणार नाही. 12 जुलैपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. जर जमिनीतील काही गुंठ्याची खरेदी करायची असेल, तर सर्व्हे क्रमांकाचा ले आऊट करुन त्याला जिल्हाधिकारी वा प्रांताधिकाऱ्यांची परवानगी गरजेची असेल.