आपला जिल्हा
अखेर बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली……! ‘हे’ असतील नवे जिल्हाधिकारी……!

बीड दि.11 – बीडच्या जिल्हाधिकारी पदी हिंगोलीचे सिईओ राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश दिल्यानंतर शासनाने ही नियुक्ती केली
आहे.
मागच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने नरेगा प्रकरणी चौकशीत दिरंगाई केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जगताप यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी नेमले आहेत.