#Social
पारधी समाजाच्या लाभार्थ्यांनी विविध योजनेसाठी अर्ज करावेत……!
परभणी, दि. 12 – जिल्ह्यातील पारधी समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी मालवाहु ॲपे ॲटो व युवती-महिलांसाठी हळद व मिरची कांडप मशीन आणि बेरोजगार युवक-युवतींना पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असून परिपुर्ण कागदपत्रासह दि.30 ऑगस्ट 2021 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
पारधी समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांना मालवाहु ॲपे ॲटो देणे या वैयक्तिक योजनेत शासन सहभाग 2 लाख 15 हजार रुपये तर उर्वरीत सहभाग लाभार्थ्यांचा राहील. पारधी समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगार युवती व महिलांना हळद मिरची कांडप वैयक्तिक योजना आणि पारधी समाजाच्या सुशिक्षीत बेरोजगार युवकांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासन हिस्सा 2 लाख 70 हजार रुपये तर उर्वरीत हिस्सा लाभार्थ्यांचा असेल. तसेच पारधी समाजातील युवक-युवतींना पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण योजना अशा चार योजनेसाठी अर्ज करावेत. दोन्ही योजनांसाठी अर्ज केल्यास कमी लाभाच्या योजनेचा अर्ज रद्द करण्यात येईल. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. योजना रद्द करण्याचे अथवा बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी यांना आहेत. असेही कळविण्यात आले आहे.