#निधन वार्ता
केज तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या……!
केज दि.१३ – एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील कानडी बदन येथे घडली. बंडू देविदास नाईकवाडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
कानडी बदन येथील बंडू देविदास नाईकवाडे ( वय ५२ ) हे शेती करीत होते. त्यांनी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवारातील शेतात जाऊन आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, जमादार कल्याण सोनवणे, पोलीस नाईक शामराव खनपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. बंडू नाईकवाडे या शेतकऱ्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. सर्जेराव नाईकवाडे यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार कल्याण सोनवणे हे करीत आहेत.