क्राइम
तीस वर्षांपासून फरार आरोपी केज पोलिसांनी केला जेरबंद……!
केज दि.१४ – तीस वर्षांपासून दरोड्याचा गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडला. विशेष म्हणजे केज शहरातच दबा धरून बसलेला आरोपी पोलिसांना चकवा देत होता.
तालुक्यातील पिंपळगाव येथील उत्तम शिवराम शिंदे याच्यावर केज पोलीस ठाण्यात सन १९९१ मध्ये गु.र.नं. २३१/१९९१ भा.दं.वि. ३९५ नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. त्या पासून तो सुमारे तीस वर्षे फरारी असून पोलिसांना चकवा देत होता. तसेच सन २०२० मध्ये पुन्हा त्याच्यावर गु.र.नं. ४४७/२०२० भा.दं.वि. ४०१ नुसार चोरांच्या टोळीत सक्रिय असल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान दि. १३ ऑगस्ट रोजी उत्तम शिंदे याला केज पोलिसांनी क्रांतीनगर भागातुन ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, डीबीचे दिलीप गित्ते, अशोक नामदास, शेख मतीन, अशोक गवळी हे सहभागी झाले होते.