देशविदेश
महाराष्ट्र कन्येचे अफलातून धाडस, 129 भारतीयांना आणले सुखरूप…..!
अमरावती दि.१८ – अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. तालिबान्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या तणावपूर्ण वातावरणातून 129 भारतीय व इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच विमान आज भारतात दाखल झालं. या बिकट परिस्थितीत विमानात हवाई सुंदर म्हणून अमरावतीची कन्या श्वेता शंके हीने कर्तव्य बजावले. आज सकाळी 129 भारतीयांना घेऊन एआय 244 या विमानाने काबुल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे, त्यांना मार्गदर्शन करीत आपल्या मायदेशी आणण्यासाठी आपल्या कार्यकुशलतेवर 129 भारतीयांना यशस्वी परत आणले.
त्यामुळे सध्या श्वेताच सर्व स्थरातून कौतुक केलं जातंय.अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून तिची विचारपूस केली. तिला कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असा धीर दिला. काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाइन्स विमान लँड झालं त्यावेळी फायरिंगचे आवाज येत असल्याचे श्वेता हिने सांगितले, श्वेता अजूनही एअर क्राफ्टवर असल्याचं तिने पालकमंत्र्यांना सांगितलं.
तिच्या या धाडसाबद्दल तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचलं असताना त्याला लँडिंग करू दिले जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबुलच्या एअरपोर्ट उतरलं आणि भारतीयांना सुखरूप परत देखील घेऊन आलं. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्वेताच्या आई-वडिलांना याचा सार्थ अभिमान देखील वाटतोय.