क्राइम
नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार…….!

नेकनुर दि.१८ – येथुन जवळच असलेल्या साखरे बोरगाव शिवारात एका ११ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात बीड येथील विक्रम पवार (वय २४ ) याच्याविरुध्द नेकनुर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडीत मुलगी शेतात असताना यातील आरोपी विक्रम पवार याने पैशाचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची फिर्याद पिडितेच्या आईने दिली आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध पोक्सो सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करित आहेत.