#Accident

३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, केज तालुक्यातील घटना……! 

 केज दि.१८ – एका ३५ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील मोटेगाव येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. संतोष धर्मराज पौळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
     मोटेगाव येथील संतोष धर्मराज पौळ ( वय ३५ ) यांची शिवारात पडक नावाच्या शेतात जमीन असून ते बीड येथे व्यवसाय करीत होते. तर त्यांचे कुटुंब ही बीडला वास्तव्यास होते. मंगळवारी संतोष पौळ हे गावी आले होते. बुधवारी सकाळी पडक नावाच्या शेतात जाऊन संतोष पौळ यांनी आंब्याच्या झाडास नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक संपत शेंडगे व पोलीस नाईक शामराव खनपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रंगनाथ तात्याबा पौळ यांच्या माहितीवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक संपत शेंडगे हे पुढील तपास करत आहेत. संतोष पौळ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close