क्राइम

रॅगिंगने घेतला बीडच्या डॉक्टर तरुणाचा बळी…….!

बीड दि.19 – नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बीडच्या स्वप्नील शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्वप्नील शिंदे याची अनेक दिवसांपासून रॅगिंग होत होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणात मंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
                    स्वप्नील महारुद्र शिंदे हा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून २०१८ला एमबीबीएस झाला. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलनं चक्क गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठीही स्वप्नीलला, सरकारी कोट्यातून मेरिटवर ऍडमिशन मिळाली होती. आपल्या अभ्यासु गुणांनी स्वप्नील हा विद्यार्थ्यांत लोकप्रिय होता. मात्र त्याच्या याच हुषारीचा काहींना अतोनात राग होता. नाशिकला तेच झालं आणि त्याच्या सिनिअर असलेल्या दोन विद्यार्थिनींनी त्याचा छळ सुरू केल्याचा आरोप त्याचे वडील महारुद्र शिंदे यांनी केला आहे. यातुनच बुधवारी सकाळी स्वप्नीलचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. स्वप्नील बाथरुममध्ये पडला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला असे रुग्णालय प्रशासन सांगत असले तरी स्वप्नीलने छळाला कंटाळून आत्महत्या केली असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close